Thursday, March 10, 2016

Success Story: Vishal Dhede (STI-2014)



नाव :- विशाल दिलीप धेडे

शिक्षण :- B.E. ( E & TC)

मिळालेली Post :- विक्रीकर निरीक्षक

अभ्यासाची पद्धत :- Self Study ( at home not even in library) तेसुध्दा Full Time Parmanent Job करत करत.

माझ्या प्रवासाबद्दल :-
      मी २०१२ मध्ये सहज STI ची परीक्षा दिली होती (काहीही अभ्यास न करता). मी ती पूर्वपरीक्षा पास झालो पण मुख्य परीक्षेवर काहीच लक्ष दिले नाही. माझा JOB पण सुरु होता. आणि मनामध्ये १ न्यूनगंड होता कि MPSC पास होण्यासाठी खूप खूप अभ्यास करावा लागतो, दिवस रात्र १ करावी लागते, तेव्हा कुठे Post मिळते. आणि आपण तर Job करतो. दिवसातले १२ तास तर Job मध्येच जातात. मग आपण कसे पास होणार, ही Negativity माझ्यात होती. त्यामुळे मी अपेक्षेप्रमाणे मुख्य परीक्षेमध्ये Fail झालो.
      त्यानंतर मी थोडा थोडा अभ्यास सुरु केला. २०१३ मध्ये PSI ची ७१४ जागांची जाहिरात आली. PSI हे माझे AIM नव्हते पण फक्त Confidence वाढण्यासाठी मी परीक्षा दिली. मी पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झालो. Physical Exam नाही दिली. पण माझा Confidence खूपच वाढला होता.
      त्यांनतर मंत्रालय सहायक २०१४ ची परीक्षा दिली. PSI परीक्षेमूळे Confidence खूपच वाढला होता त्यामुळे मंत्रालय सहायक ची पूर्व परीक्षा आरामात पास झालो. पण मी १ चूक केली. मी पूर्वपरीक्षेच्या निकालाची वाट पाहत बसलो आणि तिथेच फसलो. पूर्वपरीक्षेचा निकाल लागल्यावर मी अभ्यासाला सुरुवात केली. खूपच कमी वेळ मिळाला मुख्य परीक्षेच्या अभ्यासासाठी. आणि मुख्य परीक्षेमध्ये ६ गुण कमी पडले.
      मंत्रालय सहायक नंतर STI २०१४ ची पूर्वपरीक्षा १ फेब्रुवारी २०१५ रोजी होती (ज्या परीक्षेमधून मी STI झालो ती परीक्षा). पूर्वपरीक्षेचा पेपर चांगला गेला. आणि मंत्रालय सहायक परीक्षेला केलेली चूक परत करायची नव्हती. त्यामुळे २ फेब्रुवारी पासूनच STI मुख्य परीक्षेचा अभ्यास सुरु केला. रोज फक्त ३-४ तास अभ्यास करत होतो पण त्यामध्ये खंड पडू दिला नाही. आणि जुलै पासून मात्र रोज ६-८ तास अभ्यास करू लागलो. ( मुख्य परीक्षा १८ ऑगस्ट ला होती).

My Strategy For Pre Exam :-
      पूर्वपरीक्षेचा अभ्यास करताना जे घटक पूर्व आणि मुख्य ला सामाईक आहेत त्यावर भर देण्याचे ठरवले. म्हणजे पूर्व ला केलेला अभ्यास मुख्य परीक्षेमध्ये उपयोगी पडू शकेल. जसे कि इतिहास, राज्यघटना, अर्थशास्त्र यांसारखे विषय पूर्व आणि मुख्य ला सामाईक होते. Engg. चा विद्यार्थी असल्यामुळे विज्ञान, गणित, बुद्धिमत्ता चांगले होते. त्यामुळे मला त्या विषयांकडे थोडेसे दुर्लक्ष करून इतर अवघड वाटणाऱ्या विषयांवर लक्ष केंद्रित करणे सोपे गेले. Pre साठी जास्त काही केले नाही. जे माझे Strong Point होते ते (विज्ञान, गणित, बुद्धिमत्ता) आणि सामाईक असणारे विषय यावर पूर्व परीक्षा पास झालो.

My Strategy For Mains Exam :-
      पेपर १ मध्ये मराठी आणि English हे फक्त २च विषय (१०० गुण) आणि पेपर २ मध्ये चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, माहिती अधिकार, संगणक यांसारखे खूप विषय आणि एवढे सगळे विषय असुनसुद्धा गुण १०० च. त्यामुळे मी पेपर १ वर जास्त भर द्यायचे ठरवले. मी K’sagar चा मराठी आणि English च्या आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचा संच आणला. त्यातील प्रश्न पहिले आणि त्यानुसार अभ्यास सुरु केला. तसेच १ ऑगस्ट पासून म्हणजे परीक्षेच्या साधारण १५ दिवस आधी  रोज रात्री झोपताना १ प्रश्नपत्रिका सोडवत होतो. त्यामुळे माझा सराव झाला आणि आत्मविश्वास पण वाढला.
            नवीन अभ्यास सुरु करणाऱ्या विद्यार्थ्यांना मला सांगावेसे वाटते कि, अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी आयोगाच्या मागील ३-४ वर्षींच्या सर्व प्रश्नपत्रिका पहा. त्यामुळे तुम्हाला अभ्यास करण्याची योग्य दिशा मिळेल. कोणत्या विषयावर जास्त भर दिला पाहिजे, कोणत्या विषयावर नाही याची कल्पना येईल. तसेच अलीकडे आयोग Straight Forward प्रश्न विचारण्यापेक्षा Analytical प्रश्न विचारण्यावर जास्त भर देत आहे. त्यामुळे एखाद्या विषयाची पूर्ण माहिती असल्याशिवाय उत्तर देणे कठीण आहे. एका विषयासाठी कमीत कमी २-३ पुस्तके Refer करणे गरजेचे आहे.




Job करत करत अभ्यास करणाऱ्यासाठी :-
      फक्त अभ्यासामध्ये सातत्य ठेवा. यश नक्की मिळेल. एखाद्या दिवशी Office मध्ये खूप काम असेल तर त्या दिवशी घरी आल्यावर Relax व्हा. T.V. पहा, आवडीचे सांगत ऐका आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अभ्यास करा. म्हणजे अभ्यास पण होईल आणि तुम्ही थकणार पण नाही.

अभ्यास कसा करावा :-
      जर आपण पूर्ण वेळ अभ्यास करत असाल तर दिवसाचे भाग करून व्यवस्थित नियोजन करून अभ्यास करू शकतो. जसे कि सकाळी ३-४ तास, दुपारी २-३ तास आणि संध्याकाळी ३-४ तास. आणि आपण जर Job करत करत अभ्यास करत असाल तर सकाळी २-३ तास आणि संध्याकाळी २-३ तास तरी नक्की द्यायला हवेत. किंवा पहाटे ४-५ तास दिले तर अतिउत्तम.
कधी कधी जेवण झाल्यावर झोप येते, अशावेळी गणित किंवा बुद्धिमत्ता असे डोक्याला चालना देणारे विषय हातात घ्यावेत म्हणजे झोप लागणार नाही.
जर अभ्यासाला Mood लागत नसेल तर आपल्या आवडीचा विषय हातात घ्यावा म्हणजे अभ्यासाला mood तर लागेलच शिवाय त्या विषयाचा अभ्यास पण होईल.
      तसेच अभ्यास करताना Notes काढायची सवय ठेवा. एखादा विषय तुम्हाला सोप्पा वाटत असेल तर त्या विषयाच्या पुस्तकामध्ये Underline केले तरी चालेल. पण जर एखादा विषय अवघड वाटत असेल तर जरूर त्याच्या Notes काढा. या Notes एकदा जरी वाचल्या तरी त्या विषयाची पूर्ण कल्पना येते आणि त्या विषयाची उजळणी पण होते. आणि मला वाटते एकदा लिहिणे म्हणजे १० वेळा वाचण्यासारखे आहे.







इंटरनेट आणि smartphone चा वापर :-
      आजकाल सगळे मुले-मुली Smartphones वापरतात. चालू घडामोडी यासाठी इंटरनेट हे मध्यम खूप उपयोगी आहे. Newshunt यासारख्या Application चा वापर करून बरेचसे वृत्तपत्र वाचता येतात. तसेच Smartphones मुळे इंटरनेट चा वापर करून आपण फावल्या वेळेत एखाद्या विषयाची माहिती मिळवू शकतो. Youtube वर तज्ञ लोकांचे मुलाखती, मार्गदर्शन याचा फायदा घेऊ शकतो. youtube वर सुद्धा बऱ्याच विषयांचे मार्गदर्शन उपलब्ध आहे. बाळासाहेब शिंदे सरांच्या Audio notes आणि इतर विषयांच्या notes मी रिकामा वेळ मिळाला कि, किंवा बाहेरगावी गेल्यावर ऐकत असे. त्यामुळे सुद्धा अभ्यासात सातत्य राहत होते.
Classes ची गरज नाही :-
      माझे रोज जवळपास १२ तास Job मध्ये जायचे. त्यामुळे मला Class लावायला वेळच नव्हता. मी Self Study वरच भर दिला. आणि यश मिळालेच. माझ्या मते, खरच class लावायची गरज नाही. फक्त प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करत रहा, यश नक्की मिळेल.

वापरलेली पुस्तके :-
१)      मराठी – फक्त आणि फक्त बाळासाहेब शिंदे
२)      English – बाळासाहेब शिंदे, Unique Academy (M.J.Shaikh)
३)      चालू घडामोडी- रोजचे वृत्तपत्र ( महत्वाच्या बातम्या लिहून/कात्रण काढून ठेवणे),  
             लोकराज्य, योजना.
४)      बुद्धिमत्ता – फक्त आयोगाचे मागील परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्नांचा सराव.
५)      इतिहास – बिपीन चंद्र, जयसिंगराव पवार, ११ वी च इतिहास च Textbook,
          Dr.अनिल कठारे.
६)      भूगोल – A.B. सवदी (The Mega state Maharshtra), Prof. खतीब (K’sagar)
७)      माहिती अधिकार – यशदा
८)      संगणक – K’sagar प्रकाशन
९)      राज्यघटना – तुकाराम जाधव – महेश शिरापूरकर (Unique Academy),
          रंजन कोळंबे (भगीरथ प्रकाशन)
१०)  अर्थशास्त्र – रंजन कोळंबे (भगीरथ प्रकाशन), Dr. किरण देसले (दीपस्तंभ प्रकाशन)


आत्मविश्वास महत्वाचा :-
      स्वतःवर विश्वास ठेवा. समाजातील लोक काहीही म्हणू दे तिकडे लक्ष देऊ नका. आपल्या आई वडिलांना विश्वासात घ्या. MPSC ची परीक्षा हि थोडीशी वेळखाऊ असते. त्यामुळे एका परीक्षेमध्ये साधारणपणे १ वर्ष निघून जाते. संयम पाळा. आणि १ गोष्ट लक्षात ठेवा जे लोक तुम्हाला आत्ता नावे ठेवत असतील तेच लोक Post मिळाल्यावर तुम्हाला सलाम ठोकतील.

          मी ५ वी मध्ये असताना शाळेच्या Inspection मध्ये एक बोधकथा सांगितली होती. ती बोधकथा मला आजही आठवते. ती माझ्यासाठी तरी प्रेरणादायी आहे. आणि मला विश्वास आहे कि, जे लोक Job करत करत अभ्यास करतात त्यांना सुद्धा नक्की आवडेल.
            राजू, संजू आणि अजय हे तिघे मित्र असतात. ते तिघे दहावीला असतात. त्यांची दहावीची परीक्षा जवळ आलेली असते. राजू आणि संजू हे रोज १०-१२ तास अभ्यास करत असतात आणि अजय मात्र सकाळी २-३ तास आणि संध्याकाळी २-३ तास असा अभ्यास करत असतो. त्यानंतर थोड्या दिवसांनी दहावीची परीक्षा झाली. आणि निकालाचा दिवस उजाडला. सर्व लोकांना वाटत होते कि राजू आणि संजू चांगले गुण मिळवून गुणवत्ता यादीत येतील आणि अजय मात्र कसातरी काठावर पास होईल. पण निकाल लागल्यावर मात्र उलटेच घडले. राजू आणि संजू कसेतरी काठावर पास झाले होते आणि अजय गुणवत्ता यादीत आला होता. लोकांनी आश्चर्याने तोंडात बोटे घातली. हे कसे शक्य आहे याचा विचार करू लागले.
      पण हे खरच झाले होते. कारण राजू आणि संजू यांनी फक्त जास्त अभ्यास केला होता पण तो अभ्यास करताना त्यांचे मन स्थिर नव्हते. याउलट अजय ने मात्र सकाळी थोडा आणि संध्याकाळी थोडा असा अभ्यास केला पण तो मन लावून केला होता.
तात्पर्य :- अभ्यास किती वेळ केला याला महत्व देऊ नका तर तो किती मन लावून केला याला महत्व द्या. Quantity is not important but quality is important.




काही महत्वाच्या टिप्स :-
१)      संयम ठेवा. आणि संयामाबद्दल अधिक सांगायचं तर- Patience is not the ability to wait, but the ability to keep a good attitude while waiting.
२)      अभ्यासामध्ये सातत्य ठेवा.
३)      कोणतीही परीक्षा दिल्यावर त्या परीक्षेच्या निकालाची वाट न पाहता पुढील अभ्यास सुरु ठेवा.  Never dream for success but work for it.
४)      Quality Study करण्यावर भर द्या. Quantity study वर भर देऊ नका.
    कारण Quantity पेक्षा अभ्यासाची Quality महत्वाची.
५)      कोणताही विषय नीट समजून घ्या. पाठांतर करू नका. MPSC ची परीक्षा हि        १० वी - १२ वी सारखी परीक्षा नाहीये. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देताना उमेदवार किती लवकर आणि अचूक निर्णय घेऊ शकतो हे आयोगाला जाणून घ्यायचे असते.
६)      प्रत्येक विषयावर Group Discussion करायला मिळाले तर खूप चांगले. (मला ती संधी मिळाली नाही). Group Discussion मुळे खूप फायदा होतो. फक्त आपला Group चांगला हवा.
७)      स्वतःवर विश्वास ठेवा आणि समाजातील लोकांचा जास्त विचार करू नका. दुसऱ्या सोबत तुलना करू नका. Don’t compare yourself with anyone in this world, if you do so then you are insulting yourself.

शेवटी एवढच सांगेन –
      मंझील इन्सान कि हौसले आजमाती है
      सपनों के परिंदे, आंखों से हटाती है
      किसी भी बात से हिम्मत मत हारना
      ठोकर ही इन्सान को चलना सिखाती है


9 comments:

  1. Congratulation to you Bhau...Very Informative and Nice Post

    ReplyDelete
  2. very inspirational..... thanks for sharing your story.

    ReplyDelete
  3. very inspirational and motivating.... Thank you for sharing😊

    ReplyDelete
  4. Very Very Good Information Sir.........

    ReplyDelete
  5. for me, it was a very motivational story. thanku sir.... because i am a working women....

    ReplyDelete
  6. for me, it was a very motivational story. thanku sir.... because i am a working women....

    ReplyDelete
  7. Awesome...n really motivational ...

    ReplyDelete