Thursday, March 3, 2016

Success Story: Dr Rahul Mehetre ( Assistant 2015: Rank 25)



नाव:- डॉ.राहुल संपत मेहेत्रे
 शिक्षण:- BDS(Dentist)

मिळालेली पोस्ट:- मंत्रालय सहायक(Rank-25)

मुख्य परीक्षेसाठी वापरलेली पुस्तके:-
*पेपर १
१)मराठी – मो.रा.वाळंबे आणि बाळासाहेब शिंदे
२)इंग्रजी – पाल & सुरी आणि एम.जे.शेख(Unique Academy)
*पेपर २
१)चालू घडामोडी :– युनिक बुलेटीन , GK Today Website
२)बुद्धिमत्ता चाचणी :– Arihant Publication व MPSCच्या अगोदरच्या परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांचा सराव
३)इतिहास :- बिपन चंद्र(K’Sagar) , जयसिंग पवार
४)महाराष्ट्राचा इतिहास :– ११ वी इतिहास
५)भूगोल:- महाराष्ट्राचा भूगोल- ए.बी.सवदी
६)माहितीचा अधिकार :- यशदा(राजहंस प्रकाशन) ,राहुल पाटील(Unique Academy)
७)पंचायतराज :- K’Sagar
८)संगणक व माहिती तंत्रज्ञान :- चंद्रकांत मिसाळ
९)भारतीय संविधान व राजकारण :- रंजन कोळंबे , तुकाराम जाधव(Unique Academy-Part1)
“Aim At Sky and Shoot High!!!”
१)अभ्यासाला सुरुवात कशी करावी :-
नवीन उमेदवारांना भेडसावणारा सर्वात पहिला प्रश्न म्हणजे “नेमका अभ्यास कुठून सुरु करावा ?” हाच असतो.यावर मी सांगेन की,तुमच्या आवडत्या विषयापासून अभ्यासाला सुरुवात करावी म्हणजे तुमची अभ्यासाची सुरुवात कंटाळवाणी होणार नाही.आवडते विषय सुरुवातीला संपवून टाका म्हणजे अभ्यास होतोय याचाही आनंद होत राहील व कंटाळवाणे विषय पण आपोआप आवडायला लागतील.एखादा विषय आवडत नाही,खूप boring subject आहे असे म्हणून कुठलाही विषय option ला टाकू नका.असे केले तर तुम्ही स्पर्धेतून बाहेर फेकले गेलेच म्हणून समजा.सर्व विषयांचा अभ्यास मन लावून करणे क्रमप्राप्त आहे.तुम्ही fulltime फक्त अभ्यास करत असाल तर दिवसाचे २ किंवा ३ (प्रत्येकी ६ तासाचे २ किंवा ४ तासाचे ३) भाग करून रोज २ वा ३ विषयांचा अभ्यास करणे सहजशक्य आहे.दिवसभर एकच विषय शक्यतो अभ्यासु नका.दिवसाच्या शेवटी तो विषय कंटाळवाणा होऊन जातो.तुम्ही जॉब करून अभ्यास करत असाल तरी किमान २ विषय अभ्यासणे शक्य आहे.सकाळी जॉबला जाण्याअगोदर एक विषय व संध्याकाळी आल्यावर एक विषय.
२)पुस्तके कुठली वापरावीत :-
आजकाल बाजारात एकाच विषयावरची अनेक पुस्तके उपलब्ध आहेत.निवड झालेल्या उमेदवारांची मदत घेऊन नेमकी योग्य ती पुस्तके स्वतःची खरेदी करावी.स्वतःची पुस्तके असल्यास आपल्याला हवे तिथे महत्वाचे मुद्दे अधोरेखित करता येतात.महत्वाचे मुद्दे अधोरेखित करताना शक्यतो लाल शाईचा पेन वापरावा.लाल शाई मुळे पुढच्या वेळी तेच पुस्तक वाचताना महत्वाचे मुद्दे चटकन लक्षात येतात व उजळणी दरम्यान वेळेची बचत होण्यास मदत होते.
बरेच विद्यार्थी बऱ्याच जणांकडून माहिती घेऊन खूप सारी पुस्तके गोळा करतात व पूर्णपणे एकही पुस्तक वाचत नाहीत.हे पूर्ण चुकीचे आहे.तसे अजिबात करू नका.एक विषयाची २ चांगली पुस्तके तुम्हाला पोस्ट मिळवून देण्यासाठी पुरेशी आहेत.एकाच विषयाची पाच-सहा वेगवेगळी पुस्तके वाचण्यापेक्षा एक वा २ चांगली पुस्तके पाच ते सहा वेळा वाचल्यास पोस्ट मिळण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही.
३)पुस्तकात नेमके काय वाचावे ...Point to Point(P to P) syllabus कसा लिहून काढावा:-
याचे उत्तर आयोगाने दिलेल्या अभ्यासक्रमातच आहे.अभ्यासक्रम एकदा हाताने लिहून काढावा.पूर्ण अभ्यासक्रम Point to Point स्वरुपात लिहून काढावा.P to P syllabus कसा लिहून काढायचा त्याचा नमुना म्हणून सहायक मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम मी इथे देत आहे.कंसात गुणांचे सर्वसाधारण वितरण दिले आहे.
P to P syllabus मुळे नेमके काय वाचायचे हे समजेल व गोंधळ उडणार नाही.लिहून काढलेला अभ्यासक्रम आपण अभ्यास करत असलेल्या ठिकाणी भिंतीवर चिकटवून ठेवावा म्हणजे ध्येय व आपला अभ्यास दोन्ही आपल्या समोर राहील.
१)चालू घडामोडी :- जागतिक तसेच भारतातील ( १० )
२)बुद्धिमत्ता चाचणी ( १० )
३)महाराष्ट्राचा भूगोल :- ( ६-७ )
महाराष्ट्राचा रचनात्मक भूगोल
महाराष्ट्राचे मुख्य रचनात्मक विभाग
Climate
पर्जन्यमान व तापमान
पर्जन्यातील विभागवार बदल
नदया
पर्वत व डोंगर
राजकीय विभाग
प्रशासकीय विभाग
नैसर्गिक संपत्ती – वने व खनिजे
मानवी व सामाजिक भूगोल – लोकसंख्या , Migration of population व त्याचे source आणि destination वरील परिणाम
ग्रामीण वस्त्या व तांडे
झोपडपट्ट्या व् त्यांचे प्रश्न
४)महाराष्ट्राचा इतिहास ( ६-८ )
सामाजिक व आर्थिक जागृती (१८८५-१९४७)
महत्वाच्या व्यक्तींचे काम
स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे व् शिक्षणाचा परिणाम/भाग
स्वातंत्र्यपूर्व काळातील ईतर समकालीन चळवळी
राष्ट्रीय चळवळी
५)भारतीय राज्यघटना ( १०-१२)
घटना कशी तयार झाली
घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे
घटनेची महत्वाची कलमे
घटनेची ठळक वैशिष्ट्ये
केंद्र व राज्ये संबंध
निधर्मी राज्य
मुलभूत हक्क व कर्तव्ये
राज्यधोरणाची मार्गदर्शक तत्वे – शिक्षण
युनिफॉर्म सिव्हील कोड
स्वतंत्र न्यायपालिका
राज्यपाल
मुख्यमंत्री व मंत्रीमंडळ – Role अधिकार व कार्ये
राज्य विधिमंडळ – विधानसभा , विधानपरिषद व त्यांचे सदस्य – अधिकार व कार्ये
विधि समित्या
६)माहिती अधिकार अधिनियम २००५ (४-५)
७)संगणक व माहिती तंत्रज्ञान (१०)
आधुनिक जगातील संगणकाची भूमिका
वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर
डाटा कम्युनिकेशन
नेटवर्किंग आणि वेब टेक्नोलॉजी
सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध
नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळवण्यासाठी होणारा उपयोग
भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा
शासनाचे कार्यक्रम – Media Lab Asia , विद्या वाहिनी , ज्ञान वाहिनी , सामुहिक माहिती केंद्र ई.
माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मुलभूत प्रश्न व त्याचे भवितव्य
८)राजकीय यंत्रणा ( शासनाची रचना अधिकार व कार्ये ) ( २०-२२ )
केंद्र सरकार
केंद्रीय विधिमंडळ
राज्यसरकार व प्रशासन
९)जिल्हा प्रशासन , ग्रामीण आणि नागरी स्थानिक प्रशासन ( १२-१५)
१०)न्यायमंडळ (७-८)
न्यायमंडळाची रचना
एकात्मिक न्यायमंडळे-कार्ये
सर्वोच्च व उच्च न्यायालय – भूमिका , अधिकार व कार्ये
दुय्यम न्यायालये
लोकपाल
लोकायुक्त
लोक न्यायालय
सांविधानिक आदेशाचे रक्षण करणारे न्यायमंडळ
न्यायालयीन सक्रियता
जनहित याचिका

४)नोट्स काढाव्यात का :-
तुम्हाला आवडणाऱ्या विषयाच्या नोट्स नाही काढल्या तरी चालतील.पण तुम्हाला कंटाळवाणा वाटणाऱ्या विषयांच्या नोट्स जरून काढा.त्यामुळे विषय नीट समजण्यास मदत होईल व परत वाचतांना कंटाळा देखील येणार नाही.अभ्यास करताना तो enjoy करा.तो कंटाळवाणा होऊन देऊ नका.
५)क्लासेस लावावेत का :-
MPSC च्या नवीन अभ्यासक्रमात सद्यस्थितीत खूप बदल झालेला आहे.क्लास मधून मार्गदर्शन मिळते,पण पोस्ट मिळवण्यासाठी लागणारी मेहनत तर तुम्हालाच करायची आहे.मी स्वतः कुठलाही क्लास न लावता self-study वर ही पोस्ट मिळवली आहे.
६)अभ्यासक्रमात Internet चा वापर:-
माझ्या तयारी मध्ये इंटरनेटचा वापर खूप महत्वाचा राहिला.क्लासरूम कोचिंग घेणे शक्य नसल्यामुळे मी यु-ट्यूब वरील काही तज्ञांनी टाकलेल्या लेक्चर्सचा वापर मोठ्या प्रमाणावर केला.ह्या लेक्चर्सचा फायदा म्हणजे तुम्ही ती तुमच्या सोईप्रमाणे कुठेही,कितीही वेळा ऐकू शकता.इंटरनेट वरून लेक्चर्स डाउनलोड करून स्मार्टफोन मध्ये save करून ठेवायचे.प्रवासात,रात्री झोपण्या अगोदर केव्हाही आपण ऐकू शकतो.काही महत्वाचे यु-यूब channels ..
*History – Fantastic fundas
*Geography- Mrunal Patel
*Economics- Mrunal Patel
*Polity-Unacedemy(by Roman Saini)
Fantastic fundas
Kalyan sir
७)कट ऑफ डोक्यात ठेवून परीक्षेला जाऊ नका....
बरेच उमेदवार मागील काही वर्षांचा कट ऑफ लक्षात घेऊन परीक्षेला जातात व कट ऑफ डोक्यात ठेवून प्रश्न attempt करतात.मुळात कट ऑफ हा खूप गोष्टींवर अवलंबून असतो.जसे की किती उमेदवार परीक्षेला बसलेय,पेपर ची difficulty level,किती पोस्ट्स साठी परीक्षा होतेय ई.त्यामुळे मागील परीक्षांचा कट ऑफ डोक्यात घेऊन जाऊ नका.एकदम relaxely पेपर सोडवा.यश तुमचेच आहे.
८)विवाहित व जास्त वय असलेल्या उमेदवारांना टिप्स :-
२८/३० वय वर्ष पार केलेल्या उमेदवारांनी स्वतःला कुठेही कमी लेखू नये.मी स्वतः २९ व्या वर्षी अभ्यासाला सुरुवात करून आता ३२ व्या वर्षी पोस्ट मिळवली आहे.अजूनही पुढे जाऊन क्लास १ पोस्ट मिळवण्याचा मानस आहेच.तुमच्यातील पोस्ट मिळवण्यासाठी लागणारी जिद्द कमी होऊ देऊ नका.
९)स्वतःवर विश्वास ठेवा – सबसे बडा रोग..क्या कहेंगे लोग !!
“Destiny is not a matter of chance; it is a matter of choice. It is not something to be waited for; but, rather something to be achieved.”
"लोक काहीही म्हणोत, आपली जी निश्चित मते आहेत त्यांना चिकटून राहा आणि मग जग तुमच्या पायाशी लोळण घेईल याबद्दल खात्री असू द्या; लोक म्हणतात,'याच्यावर विश्वास ठेवा, त्याच्यावर विश्वास ठेवा...
पण मी म्हणतो....''आधी स्वतःवर विश्वास ठेवा.'हाच उपाय आहे आत्मविश्वास असू द्या - सारी शक्ती तुमच्या मध्येच आहे, हे जाणून घ्या आणि ती प्रकट करा. म्हणा की सर्वकाही करू शकण्याचे सामर्थ्य माझ्या ठिकाणी आहे.'विष नाही, विष नाही'असे खंबीर पणे म्हटल्यास सापाचे विषदेखील बाधत नाही."
- स्वामी विवेकानंद.
१०)यशस्वी होण्याकरीता आवश्यक गुण
इच्छा – ध्येय साध्य करण्यासाठी प्रबळ इच्छा हीच आपल्याला यशाकडे नेणारी सर्वट प्रबळ असते. माणसाच्या मनामध्ये जे रूजत किंवा माणूस जे मनात आणतो आणि त्यावर विश्वास ठेवतो ती गोष्ट साध्य करू शकतो.
बांधीलकी – ध्येयाशी एकनिष्ठता असेल तरच जिंकण्याची जिद्द निर्माण होते. जेव्हा आपण जिंकण्यासाठी खेळतो तेव्हा आपण उत्साहाने, जिंकण्याचं ध्येय समोर ठेवून खेळतो. परंतू आपण जेव्हा हरू नये यासाठी खेळतो तेव्हा आपण मुळातच कचखाऊ भूमिका पत्करलेली असते. आवडनिवड आणि निष्ठ याता फरक आहे. आवडी निवडीत तडजोडा होऊ शकते निष्ठेत नाही. आपल्या निष्ठा आपल्या मुल्यांशी सुसंगत असतात. म्हणूनच मूल्यप्रणाली उचित असण हे फार महत्त्वाचं असते योग्य उद्देशाची बांधील असणाऱ्या निष्ठाच आपल्याला उचित ध्येयासाठी बांधील करतात.
जबाबदारी – यशस्वी माणसं जबाबदाऱ्या स्विकारतात. जबाबदारी स्वीकारण्यामध्ये धोका तर असतोच पण त्याचबरोबर संपूर्ण कार्याचे उत्तरदायित्त्व तुमच्यावर असतं. बहुतांश लोक आपापल्या सुरक्षीत कवचात राहतात आणि कुठलीही जबाबदारी स्विकारत नाहीत. त्यामुळे ते यशस्वी होत नाहीत. जबाबदार माणसं आपल्या चूका लक्षात घेतात आणि त्यापासून शिकतात.
कठोर परिश्रम – कठोर परिश्रमाला पर्याय नाही. हेन्री फोर्ड म्हणतो, जितके तुम्ही जास्त कष्ट कराल तितके तुम्ही जास्त नशीबवान व्हाल. सामान्य माणूस शक्तीच्या आणि क्षमतेच्या एक चतुर्थांश काम करतो. जी माण्सं आपल्या क्षमतेच्या निम्म्याहून अधिक क्षमतेने काम करतात त्यांना जग सलाम करत आणि मोजकीच माणसं आपल्या पूर्ण क्षमतेने म्हणजे १००० टक्के काय करतात त्यांना जग डोक्यावर घेतं.
All the best !!!!
Thanks Dr Rahul Mehetre...

1 comment: