सरकारी नोकर भरती फडणवीस सरकार बंद करणार अशी NEWS काही वृत्तपत्रात आहे. सगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांनी या निर्णयाचा जमेल त्या पण योग्य अशा मार्गाने विरोध करावा अशी विनंती..
असा अघोरी निर्णय सरकारने घेण्याअगोदर नोकरभरती राज्याच्या वाईट स्थितीस कारणीभूत आहे का ? याचे स्पष्टीकरण द्यावे. तसेच जलद प्रशासन व कारभार हे सरकार जनतेस कमी मनुष्याबलाद्यारे कसे पुरवणार हे सुद्धा सांगावे. दर वर्षी राजीनामे व निवृत्ती मुळे रिक्त होणाऱ्या जागा तरी सरकार भरणार का हे ही स्पष्ट करावे. राज्याचा कर महसूल वाढवायचे सोडून असे अघोरी निर्णय सरकार कसे घेतेय हेच नवल वाटतंय. बेरोजगारी कमी करायचीय म्हणून नोकर भरती नकोय तर जलद व स्वच्छ प्रशासनासाठी नोकरभरती करावी असे मला वाटते. राज्याचा कर्जाचा बोजा वाढतोय तर मंत्र्यांनी कुठे स्वत:च्या सुविधा कमी केल्याय? प्रशासकीय खर्चात घट करण्याचा नोकर भरती बंद करणे हाच एकमेव उपाय थोडीच आहे.
कृपया आपल्या प्रतिक्रिया सरकार पर्यंत पोहचवा... धन्यवाद.
No comments:
Post a Comment